Advertisement

आयसीएसई बोर्डाचा आज निकाल


आयसीएसई बोर्डाचा आज निकाल
SHARES

द काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या दहावी आणि आयसीएसच्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी १४ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा निकाल जाहीर होईल, असं बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आलं.


7 दिवसांमध्ये करा पुर्नतपासणीसाठी अर्ज

सीआयएससीईच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना www.cisce.org किंवा www.results.cisce.org या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तसंच ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक पाठवल्यानंतरही तुम्हाला एसएमएसद्वारे निकाल मिळू शकणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांमध्ये २१ मे पर्यंत पुर्नतपासणीसाठी अर्ज करता येणार आहे.


अशा प्रकारे पाहता येईल निकाल

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या www.cisce.org या अधिकृत वेबसाईटवर लॉगईन करावे
  • वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर ISC Class 12th result 2017 किंवा ICSE 10th result 2017 या लिंकवर क्लिक करावे
  • यानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं नाव, रोल नंबर, जन्म तारीख अपलोड करावी
  • यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल
  • विद्यार्थ्याना हा रिझल्ट डाऊनलोडही करता येईल
  • यानंतर विद्यार्थी त्यांच्या रिझल्टची प्रिंट आऊट काढू शकतील

यंदा २६ फेब्रुवारी ते २८ मार्च या दरम्यान दहावीची तर ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९६.४७ टक्के, तर दहावीचा निकाल ९८.५३ टक्के लागला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा