Advertisement

​ICSE निकाल: म्हणून मुंबईची पोरं झाली टाॅपर..!

दरवर्षी प्रमाणे यंदाही आयसीएसईच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल चांगला लागला आहे. बारावीच्या परीक्षेत ९७.६३ टक्के मुली पास झाल्या असून त्यांच्या तुलनेत ९४.९६ टक्के मुले पास झाली आहेत.

​ICSE निकाल: म्हणून मुंबईची पोरं झाली टाॅपर..!
SHARES

'काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन' (CISCE) बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई (ICSE) व बारावी आयसीएस (ISC) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. देशपातळीवरील या परीक्षेत मुंबईच्या मुलांनी बाजी मारली आहे. सीआयएससीई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत पोदार हायस्कूलच्या अभिज्ञान चक्रवर्तीने ९९.५० टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. तर दहावीच्या परीक्षेत ९९.४० टक्के मिळवत स्वयं दास याने देशात पहिला येण्याचा मान मिळवला.



स्वप्नवत निकाल

माझ्या आयुष्यात असा काही दिवस येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला ९९.५० टक्के मिळाल्याने माझे वैज्ञानिक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तसंच मला केमिस्ट्री या विषयात विशेष रूची आहे. मी विद्यापीठातील विविध विषयाची माहिती घेणार असून भविष्याच्या दृष्टिने योग्य पाऊल उचलणार आहे.
- अभिज्ञान चक्रवर्ती, मुंबई


अभिज्ञानच्या आईशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला असता, तो अभ्यासात पहिल्यापासूनच खूप हुशार असल्याचं त्यांनी सांगितलं. चांगली टक्केवारी मिळवण्याचं त्याचं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. त्यामुळे तो शाळेतून पहिला येईल, असं वाटत होतं. पण देशातून तो पहिला येईल, असं खरंच नव्हतं वाटलं. हा आमच्यासाठी एकप्रकारे सुखद धक्का अाहे, असं त्यांनी सांगितलं.


कुठल्या शाखेचा?

स्वयं हा मुंबईतील कौपरखैराणे सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थी आहे. तर बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेला अभिज्ञान चक्रवर्ती विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याशिवाय बारावीच्या पोदार हायस्कूलच्या प्रिया खजांची (वाणिज्य) आणि रक्षिता देशमुख(ह्युमॅनिटी), पुण्याच्या बिशप्स स्कूलची रितीशा गुप्ता देशात दुसरी आली. तर दहावीत नरसी मोनजी स्कूलची अनोखी मेहता देशात दुसऱ्या क्रमांकावर आली.




स्वयं दास हा अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार होता, त्यामुळे तो बोर्डात पहिला येईल अशी आम्हाला अपेक्षा होती.
- शारदा, शिक्षिका, सेंट मेरी हायस्कूल, कौपरखैराणे


किती टक्के निकाल?

दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही आयसीएसईच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल चांगला लागला आहे. बारावीच्या परीक्षेत ९७.६३ टक्के मुली पास झाल्या असून त्यांच्या तुलनेत ९४.९६ टक्के मुले पास झाली आहेत.

त्याशिवाय दहावीच्या परीक्षेत ९८.९५ टक्के मुलींनी बाजी मारली असून ९८.१५ टक्के मुले पास झाली आहेत. आयसीएसई बोर्डाअंतर्गत बारावीच्या परीक्षेला १०.८८ लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गोरेगावच्या विब्ग्योर शाळेतील निधी निलेश धनानी (९९ टक्के) दहावी परीक्षेत तिसरी आली आहे. विब्ग्योरचीच विश्रुती शाह, बॉम्बे स्कॉटिशची सारंथा कोरिआ, लिलावतीबाई पोदार शाळेचा सार्थक मित्तल आणि सेंट ग्रेगोरियस हायस्कूलची वेदिका माणेक या विद्यार्थ्यांनीही दहावीत तृतीय क्रमांक पटकावला आहे.



हेही वाचा-

ICSE निकाल: मुंबईचा अभिज्ञान १२ वीत, तर कोपरखैरणेचा स्वयं दास १० वीतून देशात पहिला


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा