Advertisement

३ ऑक्टोबरपासून होणार ‘आयडॉल’ची अंतिम वर्षांची परीक्षा


३ ऑक्टोबरपासून होणार ‘आयडॉल’ची अंतिम वर्षांची परीक्षा
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षांच्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. अंतिम वर्षांच्या नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच आयडॉलच्या परीक्षाही ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठीही बहुपर्यायी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून एका तासात ५० प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 

प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या पदवी परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. दरम्यान, आयडॉलने दिलेल्या अध्ययन साहित्यावर ही परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

पदवीस्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आधीच्या सत्रातील काही विषय राहिले असतील त्यांच्या परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सत्रपरीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, आधीच्या वर्षांचे गुण यांच्या आधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयडॉलमधील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन किंवा आधीच्या वर्षांतील गुण ग्राह्य धरणे शक्य नाही. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा