Advertisement

IIT मुंबईचे यावर्षी ऑनलाईन क्लासेस, इतिहासात प्रथमच 'असा' निर्णय

आयआयटी मुंबई हे फेस-टू-फेस लेक्चरवर बंदी आणणारे देशातील पहिले इंस्टीट्यूट बनलं आहे.

IIT मुंबईचे यावर्षी ऑनलाईन क्लासेस, इतिहासात प्रथमच 'असा' निर्णय
SHARES

मुंबईच्या इंडियन इंस्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी(IIT Mumbai) नं फेस टू फेस लेक्चरवर वर्षाच्या अखेरपर्यंत बंदी आणली आहे. आयआयटी मुंबई हे फेस-टू-फेस लेक्चरवर बंदी आणणारे देशातील पहिले इंस्टीट्यूट (Institute) बनलं आहे. कोरोनामुळे (COVID 19) पुढच्या सेमिस्टरपर्यंत केवळ ऑनलाइन क्लासेस घेण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहतील.

संचालक सुभाशीष चौधरी यांनी म्हटलं आहे की, कोविड-19 (coronavirus update) मुळे आयआयटी मुंबई इथं ऑनलाईन अभ्यासाच्या पध्दतीवर विचार करण्यात आला. वर्ग सुरू करण्यात उशीर होऊ नये यासाठी आम्ही तयारी करत आहोत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेसचं स्ट्रक्चर तयार केलं जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल.

आयआयटी मुंबईमध्ये असे काही विद्यार्थी आहेत जे गरीब वर्गातले आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणे देण्याचं आवाहनही संचालक चौधरी यांनी केलं आहे. ते म्हणाले की, “जमलेल्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी केले जातील. व्हिर्चुअल प्रवेशासाठी इंटरनेट डेटा देखील दिला जाईल. पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अडचण येणार नाही. आम्हाला सुमारे ५ कोटी रुपयांची गरज आहे. माजी विद्यार्थ्यांनी चांगली आर्थिक साथ दिली आहे. परंतु, केवळ यावर गरज पूर्ण होणार नाही. म्हणून मी सर्व लोकांना देणगीचं आवाहन केलं आहे.”

आयआयटी मुंबईला ६२ वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना क्लासेस सुरू होतील. देशातील अन्य आयआयटी देखील ही पद्धत अवलंबू शकतात. आयआयटी मुंबईनं यापूर्वी बर्‍याच वेळा ऑनलाईन सेमिनार केले आहेत.



हेही वाचा

Medical Exams: वैद्यकीय परीक्षांचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार

CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा