Advertisement

मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल

'क्यूएस'च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करून अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे.

मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल
SHARES

'क्यूएस इंडिया युनिव्हर्सिटी रँकिंग'नुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली असून देशातील पारंपरिक विद्यापीठांत ते चौथ्या क्रमांकावर आहे.

'क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये देशात मुंबई विद्यापीठाला १४ वं स्थान मिळालं आहे. त्याशिवाय यंदा प्रथमच आयआयटी मुंबईने बंगळुरू येथील विज्ञान संस्थेला मागे टाकत सर्व संस्थांमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.


नवे अभ्यासक्रम सुरू

'क्यूएस'च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करून अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे.


विद्यार्थी संख्येत वाढ

गेल्या ५ वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिद्ध होण्याचं प्रमाण १५६ टक्क्यांनी वाढलं आहे.


राष्ट्रीय स्तरावर मान्यता

विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणीवर कार्यरत आहेत. तर गेल्या ५ वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी प्राध्यापकांना गौरवण्यात आल आहे.


विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती आहे. या निकालाचं समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. विद्यापीठ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्र करत असून राज्य सरकारच्या मदतीने उद्योजकता वाढविण्यासाठी विद्यापीठात लवकरच 'इन्क्युबेशन सेंटर'ची स्थापना होत आहे.
- प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाने केलं ३५ हजार विद्यार्थ्यांना नापास! आरटीआयमधून खुलासा

समाजशास्त्र विभागाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाला सुरुवात



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा