Advertisement

२६ डिसेंबारपासून सुरू होणार ‘मूड इंडिगो’

आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या ४९ व्या ‘मूड इंडिगो’ला २६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. २६ ते २९ डिसेंबर असे ४ दिवस ४ रात्र हा फेस्टिव्हल रंगणार आहे.

२६ डिसेंबारपासून सुरू होणार ‘मूड इंडिगो’
SHARES

आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या ४९ व्या ‘मूड इंडिगो’ला २६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. २६ ते २९ डिसेंबर असे ४ दिवस ४ रात्र हा फेस्टिव्हल रंगणार आहे. यंदाच्या मूड इंडिगोत देशी,विदेशी कलाकारांचे कॉन्सर्ट, चर्चासत्र व विविध स्पर्धा अशा २३० पेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी असेल.

मूड इंडिगोत देशभरातील १७०० कॉलेजांमधील १ लाख ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध भारतीय गायक अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय, प्रितम, आशा भोसले, विशाल शेखर, सलिम सुलेमान, सोनू निगम, कैलाश खेर यांच्या सोबत परदेशातील द हकेन, पोर्कुपाईन ट्री, सिम्पल प्लॅन आणि डीजे विनाई यांचे म्युझिकल कॉन्सर्ट होणार आहेत. 

हेही वाचा- शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी

मनोरंजनासोबतच लिटफेस्टमध्ये पी. चिदंबरम, नारायण मूर्थी, अर्णब गोस्वामी, देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, आमिर खान, नसरुद्दीन शहा, मनोज वाजपेयी यांच्याशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी रॉक बॅण्ड स्पर्धा,डान्स स्पर्धा, फेस पेेंटिंग स्पर्धा, टाकाऊपासून उत्कृष्ट वस्त्रे बनवण्याची ट्रॅशन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, देसी बिट्स, जस्ट अ मिनिट्स, संस्कृती अशा विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा- दरवर्षी घटतेय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या, निधी वाढवूनही उपयोग नाहीच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा