Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला इस्रोचे अध्यक्ष


मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला इस्रोचे अध्यक्ष
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचा फटका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही बसला आहे. लेटमार्क मिळालेल्या दीक्षांत समारंभाला २२ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे. या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे अध्यक्ष डॉ. किरण कुमार लाभणार आहेत.


कोण आहेत किरण कुमार?

डॉ. किरण कुमार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यभार पाहतात. त्यांना भारत सरकारतर्फे त्यांच्या अत्युच्च कारकिर्दीबद्दल २०१४ साली पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं आहे. जवळपास 4 दशकांपासून ते अंतराळ क्षेत्रात कार्यरत आहेत. भास्कर, चांद्रयान-१ आणि मंगळ मोहीम अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.


पदवी प्रदान सोहळा

१५ फेब्रुवारी २०१७ या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने विश्वविक्रमी १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हा ऐतिहासिक विक्रम इस्त्रोचे प्रमुख ए. एस. किरणकुमार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमने साकार केला. या दीक्षांत समारंभामध्ये १ लाख ८७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा