Advertisement

धक्कादायक : ११ वीच्या पुस्तकात जिजाऊंचा उल्लेख शिवाजी महाराजांची पत्नी

लातुरच्या खासगी निकिता पब्लिकेशनने छापलेलं संस्कृत सारिका हे पुस्तक राजेंद्र शास्त्री यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवण्यात आली असून या वंशावळीत राजमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची 'पत्नी' दाखवण्यात आलं आहे.

धक्कादायक : ११ वीच्या पुस्तकात जिजाऊंचा उल्लेख शिवाजी महाराजांची पत्नी
SHARES

लातूरच्या निकिता पब्लिकेशननं छपाई केलेल्या अकरावीच्या संस्कृतच्या पुस्तकात जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी असा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर तातडीने हटवा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. 


संस्कृत सारिका

लातुरच्या खासगी निकिता पब्लिकेशनने छापलेलं संस्कृत सारिका हे पुस्तक राजेंद्र शास्त्री यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवण्यात आली असून या वंशावळीत राजमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची 'पत्नी' दाखवण्यात आलं आहे. संस्कृत सारिका हे वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करावे व संबंधीत पुस्तकात जिजाऊंची बदनामी करणाऱ्या लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. 


विनोद तावडेंचा खुलासा

संस्कृत सारिका प्रथम आवृत्ती - २०१२ हे अकरावीच्या पाठ्यपुस्तकाचे आणि संस्कृत सारिका कृतीपुस्तिका या अकरावीच्या खाजगी प्रकाशनाच्या संस्कृत गाईडचे नाव आहे. हे गाईड याच वर्षी बाजारात आलेलं असून मूळ पुस्तकात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दिलेली नाही. गेली सात वर्षे हे पुस्तक बाजारात असून खाजगी प्रकाशनाच्या गाईडमध्ये काय लिहिले जाते याला महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जबाबदार असत नाही, असा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

जी काही तक्रार करायची असेल ती संबंधित प्रकाशनाकडे करावी. तसंच तुम्हाला हवे ते बदल करून घ्यावे किंवा त्या प्रकाशनाविरुद्ध तक्रार दाखल करावी. तसंच मुळात या प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे योग्य नसल्याचंही या खुलासामध्ये म्हटलं आहे.


राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणारा मजकूर वादग्रस्त पुस्तकात छापला जात असून यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार परत उघड झाला आहे. हा निव्वळ करंटेपणा व इतिहासातील खोटारडेपणा असून सरकार नेहमी शिवद्रोह्यांनी पाठीशी घालत आलेली आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक, वितरकवर सतत बदनामीप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 -  संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणेहेही वाचा - 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जानेवारीपासून होणार सुरूवात
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा