Advertisement

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जानेवारीपासून होणार सुरूवात

राज्यात २४ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा ६ महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती. दरम्यान येत्या शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून ३ हजार ८४० जागा मराठा समाजाला राखीव असणार आहे.

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जानेवारीपासून होणार सुरूवात
SHARES

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात रखडलेल्या शिक्षक भरतीचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. येत्या जानेवारी २०१९ पासून शिक्षक भरती करण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मेगभरतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यत आला होता. त्यनुसार येत्या जानेवारीपासून शिक्षक भरती करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

किती जागा असणार?

राज्यात २४ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा ६ महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती. दरम्यान येत्या शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून ३ हजार ८४० जागा मराठा समाजाला राखीव असणार आहे.

विधानसभेत आश्वासन

शिक्षक भरती लवकरच होणर आहे, त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत १६ टक्के म्हणजेच ३ हजार ८४० जागा राखीव असतील, असं सांगितलं होतं.

निधीची तरतूद

काही दिवसांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्यातील जवळपास ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. दरम्यान या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळाव यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७५ कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचं तावडे यांनी म्हटल आहे.

हेही वाचा-

शिक्षणात मानवी मुल्यांचा समावेश व्हावा- दलाई लामा

सिनेट सदस्यांच्या मागण्यांकडे कुलगुरूंचा कानाडोळा- युवासेना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा