Advertisement

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी


अकरावी प्रवेशाची शेवटची संधी
SHARES

अकरावी प्रवेशाच्या नियमीत ४ फेऱ्या, २ विशेष आणि २ 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' अशा एकूण ८ फेऱ्यांच्या आयोजनानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या शेवटच्या फेरीचे आयोजन केले आहे. ही शेवटची फेरी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य' या तत्वावरच घेण्यात येईल. त्यामुळे अजूनही अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल.

अकरावी प्रवेशाच्या ८ फेऱ्या होऊनही काही विद्यार्थ्यांना अद्याप काॅलेजमध्ये प्रवेश मिळालेला नाही. शिक्षण विभागाकडूनही अजून किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र सावळागोंधळच दिसून येत आहे.


अशी असेल प्रवेश फेरी

  • ९ ते ११ आॅक्टोबर २०१७ - सकाळी १० ते ५ यावेळेत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
  • या आधी घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास, शाखा बदलायची असल्यास हा अर्ज भरता येईल.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधीत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे. 
  • आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करणे.


११ आॅक्टोबर ही अकरावी प्रवेशाची शेवटची तारीख आहे. ९ ते ११ आॅक्टोबर या वेळेत प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर काॅलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

सरासरी गुण कोणत्या आधारावर? - माजी कुलगुरू

निकाल रखडवणाऱ्या 'मेरिट ट्रॅक'लाच पुन्हा कंत्राट



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा