Advertisement

निकाल रखडवणाऱ्या 'मेरिट ट्रॅक'लाच पुन्हा कंत्राट


निकाल रखडवणाऱ्या 'मेरिट ट्रॅक'लाच पुन्हा कंत्राट
SHARES

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडण्यास कारणीभूत ठरली ती उत्तरपत्रिकांची ऑनलाईन असेसमेंट ही पद्धत. या 'ऑनलाईन असेसमेंट'चे काम मेरिट ट्रॅक या कंपनीला देण्यात आले होते. पण वेळेवर निकाल लावण्यात ही कंपनी पूर्णपणे अयशस्वी ठरली. 'ऑनलाईन असेसमेंट'मधील तांत्रिक घोळामुळे प्राध्यापकांना वेळेत उत्तरपत्रिका तपासता आल्या नाहीत. असे असूनही याच कंपनीला मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ४७७ निकालांची जबाबदारी मेरिट ट्रॅक या कंपनीकडे होती. मात्र वेळेत काम पूर्ण न केल्याच्या परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागला. ४५ दिवसांत निकाल लागावेत असा नियम असताना विद्यार्थ्यांना निकालासाठी ४ महिने वाट बघावी लागली. त्यातच हाती आलेला निकालांमध्ये अनेक चुका होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा विद्यापीठात हेलपाटे मारावे लागले. या सगळ्याला कारणीभूत ठरली ती मेरिट ट्रॅक कंपनी. तरीही याच कंपनीला २०१७ मधील परीक्षांचे काम दिल्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक नाराज आहेत.


इथे गणित चुकले

  • मेरिट ट्रॅक कंपनीने वेळेचे नियोजन केले नाही
  • विद्यार्थी संख्या मोठी असल्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे होते
  • उत्तरपत्रिका स्कॅनिंग करताना घोळ झाला
  • चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका स्कॅन झाल्या
  • उत्तरपत्रिका तपासताना प्राध्यापकांना अडचण
  • स्कॅनिंगनंतर २००० पेक्षा जास्त उत्तरपत्रिका गहाळ झाल्या


अशा अनेक कारणांमुळे मेरिट ट्रॅक कंपनी गोत्यात आली. तरीही कंपनीला पुढील एका वर्षासाठी परीक्षा निकालाचे काम देण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले.


'त्या' विद्यार्थ्यांना सरासरी गुणच

मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका स्कॅनिंग करताना २ हजारपेक्षा जास्त उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. त्यातील ५०० पेक्ष्या जास्त उत्तरपत्रिकांचा शोध लागला. तरी उर्वरित उत्तरपत्रिकांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.


मेरिट ट्रॅक या कंपनीबरोबर, एक वर्षाचे काँट्रॅक्ट झाल्यामुळे पुन्हा त्याच कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी कोणत्या कंपनीला काम दयायचे याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. गहाळ असलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
- अर्जुन घाटूूळे, प्रभारी परीक्षा नियंत्रकहेही वाचा -

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा- विद्यार्थी संघटनाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा