Advertisement

शिक्षक मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी, संघटनांच्या तक्रारी

मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीलाही कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत उपनगरात १२१३ आणि शहरात ९९ शिक्षकांनीच मतदार नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिली आहे.

शिक्षक मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी, संघटनांच्या तक्रारी
SHARES

शिक्षक मतदार संघ निवडणूक २०१८ साठीची पहिली मसुदा यादी जाहीर झाली आहे. या याद्यांमध्ये 'अनेक शिक्षकांनी नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल केले असताना शिक्षकांची नावेच नाहीत' अशी तक्रार मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे शिक्षक परिषद आणि शिक्षक भारती या संघटनांनी केली आहे.


मुंबईत फक्त ९९ शिक्षकांचीच नोंदणी!

मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीलाही कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत उपनगरात १२१३ आणि शहरात ९९ शिक्षकांनीच मतदार नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिली आहे.


नोंदणीमध्ये अनेक चुका व गफलती

शीर्षक 'मुंबई शिक्षक मतदार संघ' असे असले, तरी पुढील सर्व यादी 'कोकण विभाग शिक्षक मतदार संघ' या शिर्षकाखाली आहे. त्यामुळे सदर यादीच अवैध ठरु शकते. यादीत अनेक नावे चुकीची, पत्ते चुकीचे किंवा अपूर्ण आहेत, पिन नंबर दिलेला नाही. याबाबत पूर्ण पत्त्यानिशी आणि उचित नावे प्रसिद्ध होणे आवश्यक आहे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


अपात्र लोकांच्याही नावांची शिफारस

शिक्षक मतदार संघाची नोंदणी शाळा/कॉलेज मुख्याध्यापकांच्या शिफारशीने आणि त्यांच्यामार्फतच केली जाते. मात्र, या नोंदणी विषयी व त्यातील अटी, शर्तींबाबत अनेक शाळा, मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांनाही वेळीच पुरेशी माहिती आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे नोंदणीमध्ये अनेक चुका व गफलती राहिल्या आहेत. त्यामुळे जे मतदार होण्यास अपात्र आहेत, त्यांच्या नावांचीही शिफारस अजाणतेपणी होते, तर पात्र असूनही अनेक शिक्षकांची नोंदणीच अद्याप झालेली नाही.

शिक्षक मतदार संघाच्या यादीबाबत संदिग्धता असून अनेक शिक्षकांच्या तक्रारी आहेत. पत्ते अपूर्ण असल्याने गोंधळ उडत आहे. अर्ज भरुनही नावे आलेली नाहीत.

शिवनाथ दराडे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद


आतापर्यंत झालेली मतदार नोंदणी

मुंबई शहर : ९९
उपनगरे : १२१३
एकूण : १३१२
................

विभागनिहाय नोंदणी

बोरिवली : ३२५
कुर्ला : ७७४
अंधेरी : १४८
दादर : ७
वरळी : ६६
मुंबई शहर : ३३



हेही वाचा

'शिक्षक मतदार नोंदणीची तारीख वाढवा', शिक्षकांची मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा