Advertisement

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा

दहावीचा सोमवारी होणारा भूगोल (geography exam paper) या विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (state education minister varsha gaikwad) यांनी शनिवारी दुपारी ही घोषणा केली आहे.

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा
SHARES

दहावीचा सोमवारी होणारा भूगोल (geography exam paper) या विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (state education minister varsha gaikwad) यांनी शनिवारी दुपारी ही घोषणा केली आहे. हा पेपर पुन्हा कधी घेण्यात येईल, याची माहिती ३१ मार्च नंतर दिली जाईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारीवी इयत्तेच्या (Ssc and hsc exam) परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शेवटच्या टप्प्यात असताना शालेय शिक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने सिनेमागृह, माॅल, शाळा-काॅलेज, धार्मिक स्थळ, खासगी कार्यालये बंद करण्याचे निर्देश दिले असतानाच दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजीत वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा निर्धार होता.

परंतु राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या पाहता, कुठलीही जोखीम न पत्करण्याच्या भूमिकेतून शिक्षण विभागाने दहावीचा सोमवारचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी २३ मार्च रोजी दहावीचा भूगोलचा पेपर होणार होता. हा पेपर यंदाच्या दहावीच्या सत्रातील शेवटचा पेपर होता. सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत हा पेपर होणार होता. परंतु आपत्कालीन स्थितीत हा पेपर रद्द करण्यात आला आहे. हा पेपर केव्हा घेण्यात येईल, याची माहिती ३१ मार्च नंतर देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा