Advertisement

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! १०वी आणि १२वीच्या परीक्षांची तारीख ठरली

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! १०वी आणि १२वीच्या परीक्षांची तारीख ठरली
(Representational Image)
SHARES

राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा (Offline exams of 10th and 12th) ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा (Maharashtra state board 12th exam 2022 date) ही ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे.

तर दहावी बोर्डाची परीक्षा (Maharashtra state board 12th exam 2022 date) ही १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनं सुरु होते. परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच घेतल्या जात होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत अशी घोषणाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

परीक्षा जरी ऑफलाईन पद्धतीनं होणार असल्या तरी परीक्षांच्या दरम्यान कोरोनाचे नियम पाळूनच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

तसंच शाळा आणि सेंटर्सकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते नियम पाळले जाणार आहेत अशीही माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.



हेही वाचा

महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

शाळा पुन्हा उघडल्या, मात्र स्कूल बसेसची कमतरता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा