Advertisement

नर्सरी ते इयत्ता १च्या प्रवेशासाठी किमान वयाचे निकष शिथिल

महाराष्ट्र शिक्षण विभागानं २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय घेतला आहे.

नर्सरी ते इयत्ता १च्या प्रवेशासाठी किमान वयाचे निकष शिथिल
(Representational Image)
SHARES

मंगळवार, २१ डिसेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षण विभागानं २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते १ इयत्तेपर्यंत प्रवेशासाठी किमान वयाचा निकष शिथिल केला, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

१८ सप्टेंबर २०२० च्या सरकारी ठरावानुसार (GR) शाळा प्रवेशासाठी किमान वयाची कट-ऑफ तारीख ३१ डिसेंबर आहे. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जन्मलेल्यांना शाळांमध्ये प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.

या मुद्द्याची दखल घेत शिक्षण विभागानं २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशासाठी किमान वयाच्या निकषात बदल केला आहे, असं सोमवारी, २० डिसेंबर रोजी एका सरकारी परिपत्रकात नमूद केलं आहे.

नवीन नियमानुसार, १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ३ वर्षे पूर्ण केलेले पाळणाघरात प्रवेश घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे, १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ४ वर्षे पूर्ण केलेले ज्युनियर केजीसाठी प्रवेश घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे, १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ५ वर्षे पूर्ण केलेले सिनियर केजीसाठी प्रवेश घेऊ शकतात.


याशिवाय, १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी वयाची ६ वर्षे पूर्ण केलेले १वी श्रेणीत प्रवेश घेऊ शकतात.

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या नव्या नियमांमुळे वयाच्या समस्येमुळे कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू शकत नाही. प्रवेशासाठी कोणतीही उच्च मर्यादा निश्चित केलेली नाही, त्यामुळे ते सोईस्कर असू शकते.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा