Advertisement

राज्यातील SSC, HSC च्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC)च्या परीक्षा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे.

राज्यातील SSC, HSC च्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती
SHARES

कोरोना संसर्गाच्या (coronavirus) वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) ने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC)च्या परीक्षा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे. 

सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे महाराष्ट्र शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार की काय? अशा शंका लागलीच विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यावर खुलासा करताना राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा विचार नाही, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा- CBSE Exams: दहावीच्या परीक्षा रद्द!, बारावीच्या परीक्षा पुढं ढकलल्या

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला असून दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी जाहीर केला आहे. 

दरम्यान, दहावीची परीक्षा रद्द करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना आॅब्जेक्टिव्ह क्रायटेरियावर आधारीत गुणपत्रिका देण्यात येणार आहे. सीबीएसई दहावीची परीक्षा ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होती. गुणपत्रिकांवर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जाईल. 

तर, २ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण मंडळाकडून १ जून रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांना किमान १५ दिवस आधी त्याबाबतची नोटीस काढून कळवण्यात येईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री डाॅ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितलं आहे.

(maharashtra education minister varsha gaikwad clarifies on ssc and hsc exams)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा