Advertisement

विद्यार्थ्यांनो, बारावी निकालकरता ऑल द बेस्ट


विद्यार्थ्यांनो, बारावी निकालकरता ऑल द बेस्ट
SHARES

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी विद्यार्थ्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली होती, दरम्यान बोर्डाने ही उत्सुकता जास्त ताणून न धरता अखेर मंगळवारी बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली.

बारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांतून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ३ लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत. दरम्यान राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

बारावीचा निकाल http://mahresult.nic.in/ यांसह इतर वेबसाईटवर पाहता येणार आहे.

१) www.mahresult.nic.in

२) ww.resul.mkcl.org

३) www.maharashtraeducation.com

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी MHHSC असं एसएमएस टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा