Advertisement

दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल

दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी ८ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. यंदाचा निकाल राज्यातील ८९.४१ टक्के लागला आहे.

दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी ८ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. यंदाचा निकाल राज्यातील ८९.४१ टक्के लागला आहे. 


मुंबईचा निकाल ९०.४१ टक्के

यंदा दहावीच्या निकालासाठी मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. तर राज्यात कोकण विभागाचा निकाल ९६ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८५.९७ टक्के लागला आहे.

मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्च ते २४ मार्च २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९१.९७ टक्के आहे.


या वेबसाईटवर पाहा निकाल

  • www.mahresult.nic.in
  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • http://www.knowyourresult.com/
  • www.rediff.com/exams

    वर दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेचा बैठक क्रमांक, त्यानंतर तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं कॅपिटलमध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. या निकालाची प्रिटं आऊटही तुम्हाला लगेचच काढता येईल.


एसएमएसवर मिळवा निकाल

बीएसएनएल ग्राहकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHHSC असं टाईप करून स्पेस दिल्यानंतर आसन क्रमांक टाका आणि ते ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवा, यानंतर तुम्हाला तुमचा निकाल प्राप्त होईल.



हेही वाचा - 

यंदा विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे वाढता कल

एमएचटी- सीईटी परीक्षेत मुंबईतून खुशाल राठी टॉपर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा