Advertisement

यंदा विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे वाढता कल


यंदा विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे वाढता कल
SHARES

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारपासून एफवाय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं सध्या विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू आहे. मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेल्या ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीसाठी सर्वांची एकच धडपड सुरू झाली आहे.


विद्यार्थ्यांचा कल कुठे?

आतापर्यंत झालेल्या नोंदणीतील आकडेवारीनुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य (कॉमर्स) शाखेकड अधिक दिसून येत असून अनेक विद्यर्थी हे सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांनीही प्रवेश घेत असल्याचं प्रवेशपूर्व नोंदणीतून दिसून येत आहे.


या शाखेसाठी इतके अर्ज

मुंबई विद्यापीठातील संलग्नित कॉलेजांच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व नोंदणीत आतापर्यंत ८७ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक अर्ज कॉमर्स शाखेतील बीकॉम (अकाउंटिंग, फायनान्स) या अभ्यासक्रमाला अर्ज आले आहेत. या एकूण अर्जात बी.ए. या अभ्यासक्रमासाठी एकूण १५ हजार २८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर, बीकॉमसाठी २५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून बीएमएमसाठी २० हजार १२९ जणांनी अर्ज केले आहेत.


बीएसाठी इतके अर्ज

त्यापाठोपाठ बीएससीसाठी १० हजार ३७९ जणांनी अर्ज केले असल्याचं आकेडवारीतून समोर येत आहे. या सर्व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन भरलेल्या अर्जांची प्रत घेऊन १२ जूनपर्यंत कॉलेज प्रवेशासाठी सादर करावी लागणार आहे.


हेही वाचा - 

बारावीच्या निकालात प्रॅक्टिकल गुण गायब?

१२वी फेरपरीक्षेच्या अर्जाची तारीख जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा