Advertisement

दहावीच्या पुस्तकात आता ई-पत्रही

सध्या सर्वत्र स्मार्टफोन आणि इंटरनेटचं युग आहे. या युगात पत्रव्यवहार हा सर्वसाधारणपणे इलेक्ट्रानिक माध्यमातूनच करण्यात येतो. त्यामुळेच राज्याच्या शिक्षण मंडळाने दहावीच्या पुस्तकात ई-पत्राचा समावेश केला आहे.

दहावीच्या पुस्तकात आता ई-पत्रही
SHARES

राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या नवीन पाठ्यपुस्तकात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, अवयवदान यांसारख्या अनेक ताज्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तसंच या पुस्तकांत दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपारिक पत्रलेखनासोबतच ई-पत्र लेखन करण्यासही शिकवण्यात येणार आहे.


ई-पत्राचा समावेश का?

यंदाच्या दहावीच्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तकंही बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्यात विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र स्मार्टफोन आणि इंटरनेटचं युग आहे. या युगात पत्रव्यवहार हा सर्वसाधारणपणे इलेक्ट्रानिक माध्यमातूनच करण्यात येतो. त्यामुळेच राज्याच्या शिक्षण मंडळाने ई-पत्राचा समावेश केला आहे.


शिक्षकांच्या विचारविनीमयानेच निर्णय

ई- मेल कशा पद्धतीने करतात, त्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. यांसारखे एक ना अनेक प्रश्न याआधी विद्यार्थ्यांना पडत असतं. काळानुसार विद्यार्थ्यांची वाढती गरज लक्षात घेऊन व राज्यातील शिक्षकांशी विचारविनीमय करूनच हा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.



हेही वाचा-

इथंही राजकारण! दहावीच्या पुस्तकात भाजपा, शिवसेनेचं गुणगान

दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा