Advertisement

अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे अद्याप महाविद्यालयांकडे प्रलंबित

मुंबई विद्यापीठाने 152 महाविद्यालयांची यादी प्रकाशित केली आहे. प्रामुख्याने अनेक स्वायत्त महाविद्यालये 2019 पासून प्रवेश नोंदी प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे अद्याप महाविद्यालयांकडे प्रलंबित
SHARES

मुंबई विद्यापीठाने (mumbai university) त्यांच्याशी संलग्नित (autonomous) असलेल्या महाविद्यालयांना कडक ताकीद दिली आहे. एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांची (students) प्रलंबित कागदपत्रे सादर करा अन्यथा आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश थांबवा, असा आदेश मुंबई विद्यापीठाने दिला आहे.

मुंबई (mumbai) विद्यापीठाने 152 महाविद्यालयांची यादी प्रकाशित केली आहे. प्रामुख्याने अनेक स्वायत्त महाविद्यालये 2019 पासून प्रवेश नोंदी प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

स्थलांतर आणि हस्तांतरण प्रमाणपत्रांसह अनेक कागदपत्रे विद्यार्थ्यांची पात्रता पडताळण्यासाठी आवश्यक आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या नियमांनुसार, महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी त्याच वर्षी नोंदणी आणि पात्रता कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 

तथापि, 2019 ते 2023 पर्यंतच्या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांच्या पात्रतेशी संबंधित असंख्य प्रकरणांचे अद्याप निराकरण झालेले नाही.

30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून आणि यासंबंधित अनेक पत्रे पाठवूनही अनेक महाविद्यालयांनी (college) सूचनांचे पालन न केल्याने विद्यापीठाला अधिक कठोर पावले उचलावी लागत आहेत.

"या सर्व महाविद्यालयांना पुन्हा एकदा एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत शुल्कासह आवश्यक कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा न करणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. तसेच अशा महाविद्यालयांची परीक्षा घेण्यास परवानगी नाकारली जाईल. पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची प्रवेश प्रक्रियाही रोखली जाईल," असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक पूजा रौदाळे यांनी सांगितले. 

तसेच याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची असेल, असेही ते पुढे म्हणाले.

गेल्या चार शैक्षणिक वर्षांपासून गहाळ कागदपत्रांमुळे पुढील शिक्षण आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

जुलैमध्ये अंतिम परीक्षा पूर्ण करणारा बीए पदवीधर अजूनही त्याच्या गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या महाविद्यालयातून कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे त्याचा निकाल "राखीव" म्हणून नोंदवण्यात आला. 



हेही वाचा

सीएसएमटी येथे बेस्ट बसने एकाला चिरडले

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा जानेवारी अखेर पूर्ण ?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा