चिमुकल्यांसह मोठ्या मंडळींनाही कार्टून्सची भुरळ

 Mumbai
चिमुकल्यांसह मोठ्या मंडळींनाही कार्टून्सची भुरळ

लहान मुलांमध्ये मिकी माऊस, डोरेमॉन, छोटा भीम, बार्बी, स्पायडरमॅन या कार्टून कॅरेक्टरची भलतीच क्रेझ आहे. आता विविध आकारांच्या रंगीबेरंगी शाळेच्या बॅगवर देखील या मिकी माऊस, स्पायडरमॅन, अँग्री बर्ड्स शिवा आणि मोटू - पतलू आदी कार्टून्सची चित्रे दिसून येत आहेत. बॅगेवर दिसणारी ही कार्टून्सची चित्रे कंपास पेटी, खाऊचा डब्बा, पाण्याच्या बाटल्यांवरही दिसत आहेत. त्यामुळे चिमुकल्यांसह मोठ्या मंडळींनाही या कार्टून्सची भुरळ पडली आहे. सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची एकच गर्दी बाजारपेठेत दिसत आहे.

अवघ्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू होणार असून नव्याने शाळेत प्रवेश करायचा आहे. मग यात शाळकरी मुले असोत किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रत्येकाला नवीन गणेवेशासह, नव्या आणि इतरांपेक्षा हटके वस्तू हव्या असतात. त्याच्या आवडीत उतरतील अशा आणि सर्वांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांच्या बॅगा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर, दादर, परळ आदी ठिकाणच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. या चायना बॅगांवर मिकी माऊस, डोरेमॉन, छोटा भीम, बार्बी, स्पायडरमॅन, अँग्री बर्ड्स आदी कार्टून्स मंडळींची गर्दी झाली आहे. सध्या शिवा आणि मोटू - पतलूची क्रेझ जास्त असल्याने या बॅगा खरेदी करताना पालक आणि विद्यार्थी दिसत असले तरी, चायना बॅगांवर यंदा प्रिन्ट करण्यात आलेली विविध कार्टूनची चित्रे ही थ्रीडी स्वरूपात असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे हा बॅगेचा नवा लूक बच्चेकंपनींना आकर्षित करत आहे.

चायना बॅगेची किंमत 500 रुपयांपासून ते 1, 2 हजार रुपयांपर्यंत आहे. नायलॉनच्या बॅगा 150 रु. किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत. 50 ते 150 रुपयांपर्यंतच्या कंपासपेटी, पाण्याच्या बाटल्या, डबे बाजारात उपलब्ध आहेत. असे शालेय साहित्याचे विक्रेते रामपाल जोगाडीया यांनी सांगितले.

Loading Comments