Advertisement

मेडिकल प्रवेशासाठी बुधवारी ऑनलाईन नोंदणी


मेडिकल प्रवेशासाठी बुधवारी ऑनलाईन नोंदणी
SHARES

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 28 जूनपासून सुरू होणार आहे. 28 जून पासून मेडिकल प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरूवात होईल. 10 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक www.dmer.org या वेबसाईटवर जाहीर केले आहे. त्यानुसार 12 जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तर 14 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

त्यानंतर 24 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी ज्या कॉलेजला प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, त्यानुसार महाविद्यालयांच्या नावांचे प्राधान्यक्रम भरून देणे अपेक्षीत आहे. 1 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील.


प्रवेशादरम्यान ही कागदपत्रे अनिवार्य

  • 'नीट' परीक्षेचे हॉलतिकीट
  • गुणपत्रिका
  • ऑनलाईन नोंदणीचा अर्ज
  • नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र
  • बारावीची गुणपत्रिका
  • जन्मदाखला
  • आधारकार्ड
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र


हे देखील वाचा -

प्रॉक्सी बहाद्दरांना चाप, कॉलेजमध्ये होणार डिजिटल हजेरी!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा