Advertisement

मेडिकलच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी असून विद्यापीठाने तसा प्रस्तावही तयार केला आहे. शिवाय या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

मेडिकलच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
SHARES

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी असून विद्यापीठाने तसा प्रस्तावही तयार केला आहे. शिवाय या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित देशमुख (medical exams under muhs to be held from 15 July 2020 in maharashtra after governor bhagat singh koshyari gave permission) यांनी दिली. अमित देशमुख यांनी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी वैद्यकीय परीक्षांसंदर्भात चर्चा केली. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – २०२० परीक्षा कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता विद्यापीठाने या परीक्षा घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या आराखड्याचं सादरीकरण केल्यावर विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचं राज्यपालांनी कौतुक केलं. शिवाय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा (MUHS) अंतर्गत येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचा- एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठीही लवकरच योग्य निर्णय- उदय सामंत

येत्या १५ जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा  घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या तयारीला लागावं. यादरम्यान केवळ काही अनपेक्षित गोष्टी घडल्या तर परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून  योग्य निर्णय घेण्यात येतील, असंही अमित देशमुख म्हणाले.

  • राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केल्याचं सांगितलं. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणं शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.
  • उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसंच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा