Advertisement

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठीही लवकरच योग्य निर्णय- उदय सामंत

राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठीही लवकरच योग्य निर्णय- उदय सामंत
SHARES

राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. एटीकेटी/बॅकलाॅग (maharashtra government will soon decide over atkt and backlog university students says uday samant) असलेल्या विद्यार्थ्यांना गुण कसे मिळणार, ते कसे उत्तीण होणार, असे एक ना अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांना सतावू लागले आहेत. या विद्यार्थ्यांबाबतचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.  

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आधी झालेल्या सर्व सेमिस्टरमध्ये त्यांना मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देत उत्तीर्ण केलं जाणार आहे. परंतु असेही अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना एटीकेटी लागलेली आहे, मग अशा विद्याथ्यांना गुण कसे मिळणार? असा गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा - फायनल इयरची परीक्षा रद्द केल्यामुळे राज्यपाल नाराज, लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

यावर खुलासा करताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनातला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतलेला आहे. पण या निर्णयानंतर एटीकेटी/बॅकलाॅग असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे किंवा काही लोकं जाणीवपूर्वक निर्माण करत असतील. ज्या पद्धतीने राज्यातील विद्यार्थ्यांबद्दलचा योग्य निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला आहे. तशाच पद्धतीचा योग्य निर्णय एटीकेटी/बॅकलाॅग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्यवेळी घेण्यात येईल. युद्धपातळीवर यासंदर्भातील चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी कुठल्याही गैरसमजाला बळी पडण्याची, संभ्रमात पडण्याची आवश्यकता नाही, असं उदय सामंत म्हणाले.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. आम्हाला "कोरोना ग्रॅज्युएट" तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या ४०% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्याचं शेलाार यांनी सांगितलं. या पत्रात शेलार यांनी राज्यातील विद्यापीठांत एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? राज्यात सर्व विद्यापीठातील मिळून ४० टक्के विद्यार्थी हे एटीकेटीचे आहेत. एटीकेटीचे विद्यार्थी हे नापास गृहित धरले जातील, त्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. याचा विचार केला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले होते. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा