Advertisement

दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास होणार?


दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास होणार?
SHARES

कोरोनामुळं राज्यातील १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 'आम्ही २ दिवसांपासून राज्यातील प्रत्येक भागाचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. पण सोलापूर, वाशिम किंवा इतर ठिकाणी असेल, आम्ही शिक्षक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठेवणं याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावे, असं आम्ही सांगितलं आहे', अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनामुळे ८वीपर्यंत तसेच ९वी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपल्याला घेता आली नव्हती. त्यांचं वर्षभरातील जो परफॉर्मन्स होता तो काऊंट करुन त्यांना पुढच्या इयत्तेसाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच भविष्यातही आपण करु शकतो, असं त्यांनी सांगितलं.

दहावी आणि बरावी बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. कारण ते महत्त्वाचं वर्ष आहे. पुढच्यावर्षी विद्यार्थ्यांना अॅडमिशन वगैरे घ्यावे लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत विचार करु आणि तुम्हाला त्याबाबतच लवकरच निर्णय सांगू, अशीदेखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा