Advertisement

१५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठीच्या गाइडलाइन्स जारी केल्या असून या गाइडलाइन्सनुसार येत्या १५ आॅक्टोबरपासून देशभरातील शाळा टप्प्याटप्प्याने उघडणार आहेत.

१५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी
SHARES

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठीच्या गाइडलाइन्स जारी केल्या असून या गाइडलाइन्सनुसार येत्या १५ आॅक्टोबरपासून देशभरातील शाळा टप्प्याटप्प्याने उघडणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी बातमी असून महाराष्ट्र सरकार मात्र या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करणार की नाही? यावर पुढील बाबी अवलंबून असतील. (Ministry of Education releases guidelines for reopening of schools from 15th October in a graded manner)

आधी वरच्या इयत्तेतील आणि मग हळूहळू खालच्या इयत्तेतील शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या पातळीवर बनवायची आहे. या मानक कार्यप्रणातील विद्यार्थ्यांचं आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित सामाजिक अंतर याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पूर्णत: राज्य/केंद्रशासित प्रदेशांची असणार आहे. 

हेही वाचा - १ली ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य

पालकांनी लेखी परवानगी दिल्यानंतरच विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतील. वर्गात उपस्थित राहण्याची, हजेरीसंदर्भात मुभा देण्यात आली आहे.

शाळेत प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचं पालक/विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना देण्यात येणारा मध्यान्न आहार स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळांनी राज्याच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा