Advertisement

वैद्यकीय प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिक वंचित गट (EWS) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केलं आहे.

वैद्यकीय प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय
SHARES

केंद्रातील मोदी सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिक वंचित गट (EWS) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केलं आहे. अखिल भारतीय कोट्या अंतर्गत वैद्यकीय प्रवेशात पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा स्तरावरील वैद्यकीय मेडिकल/डेंटल कोर्स    (एमबीबीएस/एमडी/एमएस/डिप्लोमा/बीडीएस/एमडीएस) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. हे आरक्षण चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून लागू होणार आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी खासदारांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणावर सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधआन, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा- होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक– राजेश टोपे

या निर्णयामुळे दरवर्षी १५०० ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि २५०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळेल. तर ५५० आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि १००० विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण मिळणार आहे.

“आमच्या सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेडिकल प्रवेशात ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण दिलं आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचं नवं प्रतिमान निर्माण होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २००७ मध्ये एससीसाठी १५ टक्के आणि एसटीसाठी ७.५ टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्रीय शैक्षणिक संस्थेत अधिनियम लागू करण्यात आला. तोपर्यंत अखिल भारतीय कोट्यातंर्गत कोणतंच आरक्षण नव्हतं. 

या निर्णयांतर्गत ओबीसींना २७ टक्के लाभ मिळाला. मात्र हा लाभ सफदरगंज रुग्णालय, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, अलीगढ मुस्लीम विश्वविद्यालय आणि बनारस हिंदू विद्यालयात मिळत होता. राज्य मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये हे आरक्षण लागू नव्हतं. आता ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा