Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

राज्यात आतापर्यंत साडेतीन लाख जणांचं कोरोना लसीकरण

महाराष्ट्रात आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत साडेतीन लाख जणांचं कोरोना लसीकरण
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कोव्हिशिल्ड तर ३ हजार ५४५ कोव्हॅक्सिन लसी आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणावेळी त्यांनी ही माहिती दिली.

प्रदीप व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्राला १८ लाख २ हजार कोव्हिशिल्ड, तर १ लाख ७० हजार ४०० कोव्हॅक्सिन अशा १९ लाख ७२ हजार ४०० लसी प्राप्त झाल्या आहेत. बुधवारपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणं सुरु झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘युके’मध्ये २० जानेवारी या एकाच दिवशी १८२० मृत्यू झाले तर ब्राझिलमध्ये दररोज १ हजार मृत्यू होत आहेत. ब्राझिलमध्ये दररोज ५० हजार रुग्ण आढळत आहेत. जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार ते पाच महिन्यानंतर कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो ७० टक्के जास्त संसर्ग पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे, तर ४० टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात इतका हा धोकादायक आहे, असं डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

हेही वाचा- लग्नातील जेवणामुळे ११ मुलांना विषबाधा

राज्याचा मृत्यू दर नोव्हेंबरमध्ये २.२६, डिसेंबर मध्ये १.९६ आणि जानेवारीत १.६३ टक्के इतका झाल्याची तसंच  साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ४.५१ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोविडचा (covid19) आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. तसंच चाचण्यांचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

(more than 3 lakh 50 thousand people get covid 19 vaccine in maharashtra)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा