Advertisement

मुंबईतल्या शाळा 'या' तारखेपासून सुरू होऊ शकतात

मुंबईतल्या शाळा पुन्हा कधी सुरू होणार याबद्दल काय म्हणाले पालिका आयुक्त इकबाल चहल...

मुंबईतल्या शाळा 'या' तारखेपासून सुरू होऊ शकतात
SHARES

मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

इकबाल चहल यांनी यासाठी मुंबईतील जानेवारी महिन्यातील आकडेवारीचा दाखला देखील दिला. १० जानेवारीच्या दरम्यान मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत होते. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या घटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथल्या रुग्णसंख्या देखील घटत असल्याचं इकबाल चहल यांनी सांगितलं.

जानेवारीच्या १० तारखेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या जास्त होती. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. २६ जानेवारीपर्यंत मुंबईत रुग्णसंख्या १००० ते २००० या दरम्यान येईल. त्यामुळे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासंबंधी नियोजन असल्याचं इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.

७ जानेवारीला मुंबईत सर्वाधिक २० हजार ९७१ रुग्ण संख्या आढळून आली होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्येची आकडेवारी ११, ५७३ होती. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं आणि मृत्युदर याचे प्रमाण कमी असल्याचं देखील इकबाल चहल यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे. शनिवारी १०, ६६१ रविवारी ७,१९५, सोमवारी ५,९५६, आणि मंगळवारी ६,१४९ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्हीटी रेट देखील खाली आला असून ६ जानेवारीला २९.९ टक्के असणारा मंगळवारी १२.९ टक्क्यांवर आला होता. फक्त मुंबईतच रुग्णसंख्या घटत आहे असं नाही तर कोलकत्ता आणि केरळ, दिल्लीमध्येही रुग्ण संख्या कमी होत असल्याचं चहल यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

MPSC परीक्षा 'या' तारखेला होणार

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राजेश टोपे म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा