Advertisement

मुंबई विद्यापीठात दोन पोलिस चौकी उभारणार

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. या घटनेनंतर मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी कलिना कॅम्पसमध्ये दोन पोलिस चौकी उभारण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनानं केली आहे.

मुंबई विद्यापीठात दोन पोलिस चौकी उभारणार
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. या घटनेनंतर १५० वर्षाची परंपरा म्हणून मिरवणाऱ्या विद्यापीठाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणामुळं अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पावित्रा धारण केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे.  मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी कलिना कॅम्पसमध्ये दोन पोलिस चौकी उभारण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनानं केली आहे.


विद्यार्थी संघटना आक्रमक 

 कलिना कॅम्पसमधील रानडे भवनात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. त्याशिवाय विद्यापिठात काही ठिकाणी सीसीटिव्ही नसल्याचं स्पष्ट झालं होतं. यावर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करत विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली. या भेटीत युवा सेनेच्या शिष्टमंडळानं कलिना कॅम्पस येथे सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना राबवण्याची सुचना केली.  


विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

या भेटीतील चर्चेदरम्यान कलिना कॅम्पसमध्ये दोन पोलिस चौकी उभारण्यात येणार असून त्याला तत्वताः मान्यता देण्यात आली आहे. तसचं विद्यापीठात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार असून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात येणार आहेत. त्याशिवाय यापुढं मुंबई विद्यापीठाच्या महिला विकास कक्षात महिला पदवीधर सिनेट सदस्यांचीही नेमणूक करण्यात येणार असून विद्यार्थी, कर्मचारी यांच्या तक्रारीकरिता एक अंतर्गत तपास समितीही स्थापन करण्यात येणार आहे. यावेळी युवा सेनेचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, शशिकांत झोरे, शीतल शेठ, प्रविण पाटकर आणि वैभव थोरात यांचाही समावेश होता.



काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका मुलीचा विनयभंग झाला. हा प्रकार लांच्छानास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात विद्यापिठातील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार  असून विविध अभ्यासक्रमातही स्वसंरक्षणाचे धडे समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसंच मुंबई विद्यापिठाच्या परिसरात दोन पोलिस चौकीही बांधण्यात येणार असून यापुढं वुमन डेव्हलपमेंट सेलमध्ये युवा सेनेच्या महिला सिनेट सदस्याही कार्यरत असतील.
- शीतल शेठ, सिनेट सदस्या, युवा सेना



हेही वाचा -

स्कूलबस नियमावलीचं पालन करा - उच्च न्यायालय

'शाळा-कॉलेजमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या'



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा