Advertisement

विद्यार्थ्यांची भूक मुंबई विद्यापीठाला दिसेना! मेस केली परस्पर बंद!

गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न प्रलंबित असताना आठवडाभरापूर्वी अचानक विद्यार्थ्यांच्या जेवणाची मेस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राहण्यासोबतच त्यांच्या जेवणाचेही वांदे झाले आहेत.

विद्यार्थ्यांची भूक मुंबई विद्यापीठाला दिसेना! मेस केली परस्पर बंद!
SHARES

निकाल व वेळापत्रक गोंधळ, विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा, नॅक रँकिंगमध्ये झालेली विद्यापीठाची घसरण यांसारख्या गोंधळासाठी कुप्रसिद्ध झालेल्या मुंबई विद्यापीठाने आणखी एक गोंधळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न प्रलंबित असताना आठवडाभरापूर्वी अचानक विद्यार्थ्यांच्या जेवणाची मेस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राहण्यासोबतच त्यांच्या जेवणाचेही वांदे झाले आहेत.



काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या वर्षी साधारण जून महिन्यात विद्यापीठाचे 'कर्मवीर भाऊराव पाटील' हे मुख्य वसतीगृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले. या कामासाठी मुख्य मेसही बंद ठेवली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यानंतर वसतीगृहात राहात असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत तात्पुरती सुविधा करून देण्यात आली होती. वसतीगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पुन्हा तेथे हलविण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले.



विद्यापीठात मिळेना, बाहेरचे परवडेना!

मुंबई विद्यापीठात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी बाहेर गावावरून शिकायला येतात. यातील अनेक विद्यार्थी हे गरीब घरातले आहेत. त्यामुळे बाहेरचे जेवण परवडत नसल्याची तक्रार या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

गेले चार-पाच दिवस मेस बंद असल्याने आम्हाला विद्यापीठाच्या बाहेरील खाणे खावे लागत आहे. आम्हाला रोज बाहेरचे खाणे परवडत नाही. दरम्यान, मेसच्या या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणत्याही वसतीगृहाच्या अधिकाऱ्याकडून आमची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही. जर मेस लवकरात लवकर सुरू करण्यात आली नाही, तर आम्ही आंदोलन करणार आहोत.

अमित शर्मा, विद्यार्थी


मेस केली परस्परच बंद!

दरम्यान, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जेवणासाठी तात्पुरत्या मेसची सोय करून दिली. विद्यापीठातल्या मेसमध्ये ३२ रूपये प्रति थाळी अशी दर आकारणी केली जाते. मात्र या मेसमध्ये ४० रूपये प्रत्येक प्लेटसाठी आकारणी केली जात असून ती जेवणाआधी द्यावी लागायची. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या तात्पुरत्या खाण्याच्या मेसचे कंत्राट संपल्याने तीही मेस बंद करावी लागली. परंतु, वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनामार्फत दिली गेली नव्हती. त्यामुळे आता विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे.



दुसऱ्या मेससाठी कंत्राट देण्यात आले असून ती १० ते १५ दिवसांमध्ये सुरू होईल. तसेच, याबाबत परीक्षा भवन शेजारी असलेल्या गरवारे कॅन्टीनशी संपर्क साधला असून विद्यार्थ्यांकरिता तात्पुरती सोय या ठिकाणी केली जाईल.

डॉ. संतोष गिते, मुलांच्या वसतीगृहाचे वॉर्डन



हेही वाचा

मुंबई विद्यापीठातही आता 'प्लास्टिकबंदी’!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा