Advertisement

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर

एलएलबी जनरल अभ्यासक्रम सेमिस्टर तीन, एलएलबी सेमिस्टर पाच आणि पाच वर्षीय एलएलबी/ बीएलएसच्या सेमिस्टर नऊ या तीन्ही महत्त्वाच्या निकालांची घोषणा गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळातर्फे करण्यात आली.

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर
SHARES

बऱ्याच दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी काहीसा दिलासा मिळाला. गेले दोन दिवस निकाल जाहीर होत असतानाच गुरुवारीही लॉ चे आणखी काही निकाल जाहीर झाले.


'हे' तीन निकाल जाहीर

एलएलबी जनरल अभ्यासक्रम सेमिस्टर तीन, एलएलबी सेमिस्टर पाच आणि पाच वर्षीय एलएलबी/ बीएलएसच्या सेमिस्टर नऊ या तीन्ही महत्त्वाच्या निकालांची घोषणा गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळातर्फे करण्यात आली.

एलएलबी सेमिस्टर तीन या परीक्षेकरता ४५८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४२८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यातील १५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २०६० विद्यार्थी नापास झाले आहेत.

एलएलबी सेमिस्टर तीन या परीक्षेकरता ४२४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४०३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यातील १६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १८८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

एलएलबी/ बीएलएस सेमिस्टर-९ या परीक्षेसाठी १२९२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १२५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४७९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत लागलेल्या लॉ च्या निकलांमध्ये या परीक्षेचा निकाल ५६.३९ टक्के लागला असून यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.


हेही वाचा - 

'लॉ'चे रखडलेले निकाल जाहीर होण्यास सुरुवात

'लॉ' शाखेचे आणखी दोन निकाल जाहीर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा