Advertisement

'लॉ'चे रखडलेले निकाल जाहीर होण्यास सुरुवात

. मंगळवारी १५ मे रोजी 'लॉ' अभ्यासक्रमाचे दोन निकाल जाहीर केल्यानंतर बुधवारी १६ मे ला आणखी एक निकाल जाहीर करण्यात परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला यश आलं आहे. पाच वर्षे अभ्यासक्रम (एलएलबी-बीएसएल) च्या सातव्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला.

'लॉ'चे रखडलेले निकाल जाहीर होण्यास सुरुवात
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या 'लॉ' शाखेचं रखडलेलं निकाल हळूहळू जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी १५ मे रोजी 'लॉ' अभ्यासक्रमाचे दोन निकाल जाहीर केल्यानंतर बुधवारी १६ मे ला आणखी एक निकाल जाहीर करण्यात परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला यश आलं आहे. पाच वर्षे अभ्यासक्रम (एलएलबी-बीएसएल) च्या सातव्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला.


'लॉ'च्या निकलांचा प्रश्न मार्गी

मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाने पहिल्या आणि पाचव्या सत्राचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच बुधवारी सातव्या सत्राचा निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.


गुणपत्रिकाही लवकरच

दरम्यान या परीक्षेत १६९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६४३ विद्यर्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यातील ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच विद्यापीठाच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार असून लवकरच त्यांची गुणपत्रिकाही देण्यात येईल, असंही विद्यापीठाने यावेळी जाहीर केलं आहे.


हेही वाचा - 

'आठवडाभर आधी आलं परीक्षा वेळापत्रक', विद्यार्थ्यांचा दावा

२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा