Advertisement

'आठवडाभर आधी आलं परीक्षा वेळापत्रक', विद्यार्थ्यांचा दावा


'आठवडाभर आधी आलं परीक्षा वेळापत्रक', विद्यार्थ्यांचा दावा
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निकाल व वेळापत्रक गोंधळ सुरू असताना त्यात आता विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) मध्ये गोंधळाचा तास सुरू असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांनी सुरू होणाऱ्या टीवायबीएससी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जेमतेम आठवडाभर आधी जाहीर करण्यात आल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावर विद्यापीठाने बीएससी आयटी (TYBSCIT)सत्र ६च्या परीक्षेची तारीख ३१ मार्चला जाहीर केली असून या परीक्षेचे हॉलतिकीट नुकतेच उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.


नेमकं प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या टीवायबीएससी आयटीचे (TYBSCIT) वेळापत्रक ७ मे रोजी जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा १४ मेपासून सुरू होणार आहे. वास्तविक परीक्षेचे वेळापत्रक तीन ते चार आठवडे आधी जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने ७ मे रोजी जाहीर करून विद्यार्थ्यांना धक्का दिला आहे. वेळापत्रकावर एप्रिल महिन्याची तारीख असली, तरी हे वेळापत्रक ७ मे रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. तसंच, आम्ही वारंवार परीक्षेचं वेळापत्रक वेबसाइटवर तपासत होतो. मात्र, ते वेबसाईटवर नव्हतं. दरम्यान, अखेर ७ मे रोजी वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर झालं, अशी माहिती एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.



ऑनलाइन याचिका दाखल करणार

'आयडॉल'मध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे नोकरी करून शिक्षण घेत असतात. त्यामुळे आता तातडीने सुट्टी मिळणे अनेकांना अशक्य आहे. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकतील, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. तसेच याबाबत विद्यार्थ्यांकडून लवकरच ऑनलाइन याचिका दाखल करण्यात येईल, असा पवित्राही काही विद्यार्थ्यांनी घेतला होता.


विद्यापीठाने मात्र दावा फेटाळला

दरम्यान, या प्रकरणावर उत्तर देताना मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील बीएससी आयटीच्या सहाव्या सत्र परीक्षेची तारीख आयडॉलने ३१ मार्च २०१८ रोजी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक आठवडा आधी परीक्षेची तारीख जाहीर केली, असे म्हणणे योग्य नाही. तसेच, ही परीक्षा १४ मे २०१८ पासून सुरु होत असून या परीक्षेचे हॉल तिकीट १० मे रोजी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात आले आहे. तसेच, या हॉलतिकीटामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पत्ताही देण्यात आला आहे.



हेही वाचा

एलएलएमच्या गोंधळाला 'हेच' जबाबदार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा