'लॉ' शाखेचे आणखी दोन निकाल जाहीर


  • 'लॉ' शाखेचे आणखी दोन निकाल जाहीर
  • 'लॉ' शाखेचे आणखी दोन निकाल जाहीर
SHARE

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी बीएलएस, एलएलबी सेमिस्टर पाच आणि एलएलबी सेमिस्टर एक या परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. बॅचलर ऑफ लिगल सायन्स अँड बॅचलर ऑफ लॉ सेमिस्टर पाच आणि बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) सेमिस्टर एक या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून जाहीर करण्यात आलं.नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅचलर ऑफ लिगल सायन्स अँड बॅचलर ऑफ लॉ या परीक्षेच्या पाचव्या सेमिस्टरकरता २४८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २३४३ विद्यार्थी या परीक्षेकरता बसले होते. दरम्यान या परीक्षेत ७८७ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले असून १४८४ विद्यार्थी नापास झाले आहेत.

बॅचलर ऑफ लॉ या परीक्षेच्या सेमिस्टर एकसाठी ६६३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केलं होतं. त्यापैकी ५४८४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. बीएलएस एलएलबी परीक्षेप्रमाणेच या परीक्षेत १९८८ विद्यार्थी पास झाले असून ३४९५ विद्यार्थी नापास झाले.


'पुनर्मूल्यांकन प्रक्रिया लवकर सुरू करा'

मुंबई विद्यापीठाच्या डिसेंबर २०१७ - जानेवारी २०१८ दरम्यान लॉ शाखेच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परंतु, ४५ दिवस उलटूनही विद्यापीठाने निकाल जाहीर न केल्याने काही दिवसांपूर्वी लॉ च्या विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पावित्रा घेतला होता. मागील सत्राच्या सर्व परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करावेत आणि निकाल जाहीर झाल्यावर लगेच पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


हेही वाचा -

रखडलेल्या निकलापैकी आणखी सहा निकाल जाहीर

संबंधित विषय
ताज्या बातम्या