Advertisement

अखेर 'लॉ' परीक्षेच्या वेळापत्रकांत बदल

रूवारी विद्यार्थ्यांनी केलेल्या अंदोलनानंतर विद्यापीठाने 'लॉ' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. 'लाॅ'ची परीक्षा आता २ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे.

अखेर 'लॉ' परीक्षेच्या वेळापत्रकांत बदल
SHARES

'लाॅ' आणि सीए, सीएस परीक्षांच्या तारखांमध्ये घातलेला घोळ अखेर मुंबई विद्यापीठाने सुधारला आहे. सीए, सीएस आणि 'लाॅ' ची परीक्षा एकाच वेळी येत असल्याने या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली होती. अखेर गुरूवारी विद्यार्थ्यांनी केलेल्या अंदोलनानंतर विद्यापीठाने 'लॉ' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. 'लाॅ'ची परीक्षा आता २ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे.


कधी होणार होती परीक्षा?

'एलएलबी'चे अनेक विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी (सीएस) आणि चार्टंड अकाऊटंट (सीए) असे अभ्यासक्रम एकत्रच करतात. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा देशभरात एकाच वेळापत्रकानुसार होत असतात. त्याचं वेळापत्रक सुमारे ५ ते ६ महिने अगोदर जाहीर केलं जातं. त्यानुसार यावर्षी सीएच्या एक्झिक्युटीव्ह आणि फायनलच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहेत. तर 'लॉ' च्या सत्रपरीक्षाही नेमक्या त्याच कालावधीत होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. अखेर विद्यार्थ्यांनी केलेल्या अंदोलनानंतर विद्यापीठाने 'लॉ'च्या तारखांमध्ये बदल केला आहे.आंदोलनानंतर जाग

या संबंधी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. पण कोणतंही ठोस उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आलं नव्हतं. अखेर गुरूवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अंदोलन केल्यानंतर विद्यापीठाने 'लॉ' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. लॉ परीक्षा आता २ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान होणार आहेत.


या वर्षी 'लॉ'च्या परीक्षांचे निकाल उशीरा लागल्याने परीक्षा लांबणीवर पडली. सत्रपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगचेच आम्ही विद्यापीठाला तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. मात्र विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही विद्यापीठाने लक्ष दिलं नाही. आज अखेर आम्ही विद्यापीठात आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली आणि 'लॉ' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले.

- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिलहेही वाचा-

'लाॅ'च्या अॅडमिशनचा पत्ता नाही अन् विद्यापीठ म्हणतंय परीक्षा द्या!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा