Advertisement

रखडलेल्या निकलापैकी आणखी सहा निकाल जाहीर


रखडलेल्या निकलापैकी आणखी सहा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालेली असताना अनेक हिवाळी परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांना शनिवारी दिलासा मिळाला असून विविध सहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यास परीक्षा विभागाला यश आलं आहे.


३८९ परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्राअखेर एकूण ४०२ परीक्षा घेतल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ३८९ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला यश मिळालं आहे. तर अनेक विद्यार्थी मात्र अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान यातील काही विद्यार्थ्यांना शनिवारी थोडा दिलासा मिळाला. विद्यापीठाने रखडलेले सहा परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.


या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

एमएससी (M.S.C) पार्ट दोनच्या सेमिस्टर तीनच्या श्रेयांक आधारित मूल्यांकन (सीबीएसजीएस-CBSGS)पद्धतीनुसार घेतलेल्या परीक्षेचा समावेश आहे. तसेच एमएफएम (M.F.M) च्या दुसऱ्या वर्षाचा सेमिस्टर एक रिव्हाईज्ड अभ्यासक्रमाची परीक्षा आणि एमएमएम (M.M.M) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा सेमिस्टर १ चा रिव्हाईज्ड विषयाचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमएससी (M.S.C) पार्ट २ सेमिस्टर तीन, एम कॉम(M.COM) पार्ट १, एम कॉम पार्ट २ या परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत.


'लॉ'ची नाराजी मात्र कायम

लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालासंदर्भात माजी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येत्या १५ दिवसांत निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पूर्ण न झाल्याने स्टुंडट लॉ कौन्सिलतर्फे ५ मे रोजी कलिना कॅम्पस येथे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दहा दिवसांत निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासनही पूर्ण न झाल्याने स्टुडंट लॉ कौन्सिलने या विरोधात नाराजी व्यक्त करत येत्या १६ मे रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा