Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षा एक महिना पुढे


मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षा एक महिना पुढे
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढील संकट टळण्याची चिन्हे नाहीत. निकालाच्या घोळानंतर आता विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे विद्यापीठाने सत्र परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचा परिणाम पाचव्या आणि सहाव्या सत्र परीक्षांवर झाला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. बदलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. सध्या गहाळ उत्तरपत्रिकांच्या निकालाची झळ सत्र परीक्षांना बसली आहे. विद्यापीठात सध्या १६ हजार गहाळ उत्तरपत्रिकांना सरासरी गुण देण्याचे काम सुरू आहे.

सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
बीएससी
(हॉस्पिटॅलिटी)   -  १३ नोव्हेंबर  

बीएससी
(आय टी) सेम ६ - १३ नोव्हेंबर

टी वाय बिव्होक
(सेम ५)            - २० नोव्हेंबर



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा