मुंबई विद्यापीठातील परिक्षा नियंत्रकाचं पद रिकामं

 Pali Hill
मुंबई विद्यापीठातील परिक्षा नियंत्रकाचं पद रिकामं

मुंबई - मुंबई विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठातील महत्त्वाचे असे परीक्षा नियंत्रकाचे पद गेल्या 17 महिन्यांपासून रिक्त आहे. परिक्षा नियंत्रकाचं पद भरण्यासाठी विद्यापीठानं दोनदा जाहिराती काढल्या. त्यावर 1,39,816 रुपयांचा खर्चही केला आहे. एवढं करूनही विद्यापीठाला परीक्षा नियंत्रक काही मिळत नाहीये. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली विद्यापीठानं ही माहिती दिली आहे. मुंबई विद्यापीठाला परीक्षा नियंत्रक मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परीक्षा वेळेवर आणि योग्यप्रकारे घेणं तसंच परीक्षेचा निकाल वेळेत, योग्यप्रकारे लावणे इतकी महत्त्वाची जबाबदारी परीक्षा नियंत्रकावर असते. असं असताना हे पद भरण्यास विद्यापाठीकडून चालढकल केली जात असल्याचा, उमेदवार योग्य नसल्याचं कारण देत जात असल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे. तर, याचा परिणाम परीक्षा प्रक्रियेवर होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर हे पद त्वरीत भरण्याची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे गलगली यांनी केली आहे.

Loading Comments