अखेर निकीताला मिळाले अचूक पदवी प्रमाणपत्र

 Santacruz
अखेर निकीताला मिळाले अचूक पदवी प्रमाणपत्र

मुंबई - मुंबई विद्यापिठाच्या भोंगळ कारभाराचा फटका एका विद्यार्थिनीला बसलाय. निकीता किटे या विद्यार्थिनीने नुकतेच रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेचं (बॅचलर ऑफ मास मीडिया) चं शिक्षण पूर्ण केलंय. मात्र 25 तारखेला महाविद्यालयात बोलावून जेव्हा विद्यार्थ्यांना मास मीडियाच्या पदवी परीक्षेचं प्रमाणपत्र देण्यात आलं. तेव्हा निकीता किटे या विद्यार्थिनीचे नाव इंग्रजी मध्ये KITE NIKITA BABURAO SUREKHA या नावाचे मराठी रुपांतर करताना पतंग निकीता बाबुराव सुरेखा असे छापण्यात आले होते.

शुद्धलेखनाच्या या गंभीर चुका शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात याव्यात यासाठी निकीता किटे हिने पदवी प्रमाणपत्राचे फोटो ट्विटरवर शेअर करत मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात लक्ष द्यावे असे आवाहन केले होते. दोन दिवसाच्या पाठपुराव्यानंतर निकीताला यश मिळाले आहे. सध्या तिला विद्यापिठाकडून सुधारीत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

विषेश म्हणजे विद्यापिठाच्या शतकोत्तरी हिरक महोत्सव वर्षानिमित्त पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रांची रचना यंदा नव्यानेच बदलण्यात आली आहे. बारकोडसह विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी देखील विलंब झाला होता. निकितासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विद्यापिठात पदवी प्रमाणपत्रातल्या वेगवेगळ्या कारणास्तव तक्रारी केल्या आहेत. तरीही हा सावळा गोंधळ नेहमीच असतो.

Loading Comments