Advertisement

इतकी मेहरबानी का? घोटाळेबाज मेरीट ट्रॅक कंपनीला 1.18 कोटी


इतकी मेहरबानी का? घोटाळेबाज मेरीट ट्रॅक कंपनीला 1.18 कोटी
SHARES

ऑनलाइन परीक्षांच्या निकालात घोळ घालणाऱ्या वादग्रस्त मेरीट ट्रॅक कंपनीला मुंबई विद्यापीठाने 1.18 कोटी रुपये अदा केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत उघडकीस आली आहे.


घोटाळ्यानंतही इतके पैसे मोजले

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मेरीट ट्रॅक कंपनीला अदा केलेल्या आणि शिल्लक रकमेची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार मेरीट ट्रॅक सर्व्हिस प्रा. लि. कंपनीने दोन देयके सादर केली होती. एक देयक 18 मे 2017 रोजी सादर केले होते. त्याची रक्कम 1,48, 63, 750 रुपये इतकी होती. दुसरे देयक 16 ऑगस्ट 2017 रोजी सादर केले होते. त्या देयकाची रक्कम 2,69,27,350.99 इतकी आहे. या दोन देयकांची एकूण रक्कम 4,17,91,100.99 रुपये इतकी आहे. मुंबई विद्यापीठाने त्यापैकी 1,18,17,404 रुपये इतकी रक्कम अदा केली असून सध्या त्यापैकी 2,99,73,696.99 इतकी रक्कम बाकी आहे.


'या कंपनीस काळया यादीत टाका'

अनिल गलगली यांच्या मते 'ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे मुंबई विद्यापीठाची नाचक्की झाली आणि संपूर्ण जगात मुंबई विद्यापीठास परीक्षा जाहीर करण्याच्या बाबतीत सपशेल हार पत्करावी लागली, त्या कंपनीस काळया यादीत टाकत दंड वसूल करण्याऐवजी आर्थिक सहाय्य करणे चुकीचे आहे'.


कुलसचिव आणि राज्यपाल असलेले विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरु प्रो. देवानंद शिंदे यांना याविषयी पत्र लिहिले आहे. पुढील रक्कम अदा न करत दंड वसूल करण्याची मागणी केली आहे.
- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा