Advertisement

एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा द्या ऑनलाईन


एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा द्या ऑनलाईन
SHARES

एमफिल आणि पीएचडीसाची प्रवेश परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. शिवाय अर्ज आणि शुल्क देखील ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. ही परीक्षा वर्षातून एकदा होणार असून जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्याला विद्यापीठातर्फे उत्तीर्ण प्रमाणपत्र दिल जाणार आहे. या प्रमाणपत्राचा कालावधी तीन वर्षांचा असेल.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या नवीन नियमानुसार विद्यापीठाने एमफिल आणि पीएचडी संदर्भात सुधारित नियमावली जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी एमफिल आणि पीएचडी संदर्भात नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेल्या 'कुलगुरू निर्देशिकेला' मान्यता दिली. ही नियमावली १५ जून २०१८ पासून लागू करण्यात आली आहे.


परीक्षेची पद्धत?

ही ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल, एकूण १०० प्रश्न असणार असून त्यातील प्रत्येक प्रश्नाला १ गुण असणार असून एकूण १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत दोन पेपर असणार असून पहिला पेपर संशोधन पद्धती आणि इतर बाबी समाविष्ट असतील तर दुसरा पेपर हा पदव्युत्तर पदवीच्या विषयावर आधारीत असेल. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती संबंधित संशोधन केंद्रावर घेतल्या जाणर आहेत. तसंच तेथील उपलब्ध असलेल्या जागेनुसार संशोधनासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल


संशोधनाचा कालावधी

एमफिल संशोधनाचा कालावधी कमीत कमी २ सत्र किंवा १ वर्षे, तर जास्तीत जास्त ४ सत्रे किंवा २ वर्षे असणार आहे. तर पीएचडीसाठी हा कालावधी कमीत कमी ३ वर्षे व जास्तीत जास्त ६ वर्षे असणार असला तरी देखील हा कालावधी १० वर्षांपेक्षा जास्त नसेल.


संशोधन सल्लागार समिती

प्रत्येक संशोधन केंद्रावर एक संशोधन सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. ही समिती संशोधनासंबंधीची सर्व प्रक्रिया पाहणार आहे. विद्यार्थ्यांस यूजीसीच्या नियमानुसार कोर्स वर्क पूर्ण केल्यानंतर दर ६ महिन्याला त्याचा प्रगती अहवाल संशोधन केंद्राला सादर करावा लागणार आहे. त्यासोबतच संशोधन सल्लागार समितीसमोर त्याचं सादरीकरण कराव लागेल.


तोंडी परीक्षा

संशोधक विद्यार्थ्यास तोंडी परीक्षा (open defense viva) द्यावी लागणार आहे तसच या संशोधन केंद्रावर संशोधन सल्लागार समितीचे सदस्य, शिक्षक वर्ग, संशोधक विद्यार्थी व इतर विद्यार्थी याच्यासमोर ही तोंडी परीक्षा (open defense viva) पद्धतीने सादरीकरण कराव लागेल आणि त्यानंतर त्याच्या संशोधनाचे मूल्यांकन केले जाईल.


प्रबंध इन्फ्लिबनेट (INFLIBNET)

ज्या विद्यार्थ्यांची पीएचडी आणि एमफिल पदवी जाहीर झाली आहे, त्यांचं प्रबंध व लघुप्रबंध इन्फ्लिबनेटवर (INFLIBNET) अपलोड केले जातील. संशोधक विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव, संशोधनाचा विषय, मार्गदर्शकाचं नाव आणि संशोधन नोंदणीची तारीख ही सर्व माहिती प्रत्येक शैक्षणिक वर्षानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.

यूजीसीच्या नियमानुसार सदर ‘कुलगुरू निर्देशिका’ तयार केलेली आहे. यानुसारच एमफिल व पीएचडीचे प्रवेश होणार आहे. सदर परीक्षा प्रथमच ऑनलाईन घेतली जाणार असून लवकरच या वर्षीच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल जाणार आहे.
- डॉ. अर्जुन घाटुळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक

प्रत्येक विद्यापीठात संशोधनाचा दर्जा चांगला रहावा हे यूजीसीचे धोरण आहे. यामुळेच युजीसी वेळोवेळी संशोधनाच्या नियमामध्ये सुधारणा करीत असते. याच आधारावर विद्यापीठाने हे सुधारित नियम बनविल आहेत. यामुळे विद्यापीठात संशोधनाला अधिक चालना मिळेल व संशोधनात मुंबई विद्यापीठ अग्रेसर होईल अशी मला अपेक्षा आहे.
- डॉ. सुहास पेडणेकर ,कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement