ऑनलाईन असेसमेंटसाठी आज होणार कंपनीची निवड

 Kalina
ऑनलाईन असेसमेंटसाठी आज होणार कंपनीची निवड
Kalina, Mumbai  -  

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंटसाठी गुरुवारी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. यामुळे गेले काही दिवस रखडलेला निर्णय आज मार्गी लागणार आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 2 पेक्षा अधिक कंपन्यानी सहभाग घेतल्यामुळे आज कंपनीची निवड करण्यात येईल. याआधी विद्यापीठाने योग्य प्रतिसाद न मिळल्यामुळे दोन वेळा निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती.

उत्तरपत्रिकांची तपासणी जलदगतीने होण्यासाठी, विद्यार्थ्यांचे निकाल वेळेकर लागण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ऑनलाईन असेसमेंटची घोषणा केली होती. त्यामुळे एप्रिलपासून होणाऱ्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आजच्या निर्णयावर जवळपास 3 लाख विद्यार्थ्यांचे निकाल अवलंबून आहेत.

Loading Comments