Advertisement

मुंबई विद्यापीठ सादर करणार ६६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प

मुंबई विद्यापीठाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ६६ कोटी ८० लाख ८० हजार रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ सादर करणार ६६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प
SHARES

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) प्रशासनाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी (Mumbai University Financial Budget) अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ६६ कोटी ८० लाख ८० हजार रुपये तुटीचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात येणार आहे. यंदाच्या या अर्थसंकल्पात विकास योजनांच्या (Development plan) निधीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १६ लाखांची कपात करण्यात आली आहे.

विद्यापीठाकडून सुमारे ८०९ कोटींचा अर्थसंकल्प गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सिनेटमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदा विकास योजनांच्या निधीसाठी ३६ लाख ६४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा संशोधनासाठी भरीव तरतूद कण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. ही तरतूद गत वर्षीच्या तुलनेत सुमारे ९ कोटींनी वाढवण्यात आली आहे.

येत्या आर्थिक वर्षात संशोधनासाठी १० कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळते. सामान्य निधीमध्येही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी हा निधी ३९८ कोटी इतका होता तो यंदा ७१३ कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे. क्रीडा विभागासाठी यंदा ९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, विद्यार्थी विकास विभाग (Development Department) आणि सांस्कृतिक विभागासाठी (Cultural Department) ५ कोटी १४ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळते.

मागील अर्थसंकल्पातील व्हीसी फेलोजसाठीचे ९० लाख, संशोधकांचे मानधन तीन कोटी २५ लाख, शिक्षक, व्यवस्थापन, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे करण्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी वापरात आला नसल्याचं समजतं.



हेही वाचा -

छत्रपती शिवाजी महाराज पार्क!

मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा