Advertisement

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कधी? वाचा


शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कधी? वाचा
SHARES

नाशिक शिक्षक मतदार संघ आणि मुंबई - कोकण या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख निवडणूक आयोगाने २४ मे रोजी जाहीर केली आहे.


कधी होणार निवडणुका?

मुंबई, नाशिक आणि कोकणमधील पदवीधर मतदारसंघात २५ जून रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २८ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या

ही निवडणूक येत्या ८ जून रोजी घेण्यात येणार होती. मात्र सध्या शाळा बंद असून काही शिक्षक उन्हाळी सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे सर्व शाळा १५ जूनपासून सुरू झाल्यानंतर शिक्षक मतदार संघाची निवडणूक व्हावी, अशी मागणी शिक्षकवर्गातून केली जात होती. दरम्यान निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.

यंदासाठी 'हीनावे रिंगणात

कपिल पाटीलशिक्षक मतदारसंघातील आमदार 
अनिल देशमुखभारतीय जनता पार्टी
अनिल बोरनारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
शिवाजी शेंडगे शिवसेना
ज्ञानदेव हांडेखासगी प्राथमिक शिक्षक संघ 
हरिश भुरंगेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
चंद्रकांत पाटीलसेकंडरी स्कूल क्रेडिट सोसायटी 
प्रशांत रेडिजमुख्याध्यापक संघ


मुंबई तसेच मुंबई उपनगरात वास्तव्यास असणारे माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच विद्यापीठाशी सलंग्न असलेले कोर्सेस यातील २५ ते २७ हजार शिक्षक मतदार म्हणून असणार आहेत. दरम्यान यंदाच्या मतदार यादीतील मूळ व पुरवणी यादी १ करिता फक्त ७५९२ शिक्षकांनी नोंदणी केली असून शिक्षकांमध्ये निरुत्साह दिसत आहे. २०१२ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता जवळपास २१००० शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली होतीदरम्यान पुरवणी यादी २ करिता अजून काही शिक्षकांची नोंदी प्रक्रिया सुरू असून ती नोंदी झाल्यानंतरही फक्त १० ते १२ हजारापर्यंत मतदार जाण्याची शक्यता आहे. 

प्रशांत रेडिज, मुख्याध्यापक संघ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा