बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Borivali
बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
See all
मुंबई  -  

बोरिवलीतील नामदार अजित पवार कॉलेजच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कॉलेज बंद करण्यासाठी मोर्चा काढला. अजित पवार यांचा या कॉलेजशी काहीही संबंध नाही. कॉलेज प्रशासन अजित पवार यांच्या नावाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा मोर्चा राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष इंद्रपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मुलांच्या भविष्याशी खेळल्यासंबंधी पवार कॉलेज आणि मंकरंद ट्युटोरियल विरोधात तक्रार दाखल करत पवार कॉलेजच्या प्रशांत गायकवाड आणि मंकरंद ट्युटोरियलच्या मंकरंद बोडूस यांना पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे मुलांना जी पावती देण्यात आली त्यावर अजित पवार यांचं नाव आहे.

दरम्यान, बोरिवलीच्या अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द केल्यानंतर, शिक्षण विभागाने आपला मोर्चा अनधिकृत शाळांकडे वळवला आहे. अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाईचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. अनधिकृत शाळा आढळल्यास शाळेच्या व्यवस्थापनास त्वरीत शाळा बंद करावी लागणार आहे. त्याप्रमाणे व्यवस्थापनास 1 लाखाचा दंडही भरावा लागणार आहे. सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी 10 हजार रुपये दंड शाळेला ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला शाळेत घालताना ती शाळा अधिकृत आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.एखादी शाळा अनधिकृत आढळल्यास शाळेवर त्वरित कारवाई करण्यात येईल आणि शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत अॅडमिशन मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.


हेही वाचा - 

बोरीवलीतील अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.