Advertisement

परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाहीच! शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

सोमवारी परीपत्रक काढत शिक्षण मंडळानं परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असं जाहीर करत शिक्षण मंत्र्याच्या आदेशाला अक्षरश: केराची टोपली दाखवली आहे.

परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाहीच! शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
SHARES

अपवादात्मक परिस्थितीत पेपर सुरू झाल्यानंतर पुढील अर्ध्या तासापर्यंत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी स्पष्ट केलं होतं. मात्र सोमवारी परीपत्रक काढत शिक्षण मंडळानं परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असं जाहीर करत शिक्षण मंत्र्याच्या आदेशाला अक्षरश: केराची टोपली दाखवली आहे.  


प्रचलित पद्धत बंद

प्रचलित पद्धतीनुसार १०.३० वाजता विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यात येतो. १०.४० वाजता त्यांना उत्तरपत्रिकांचं वाटप करण्यात येतं. पुढच्या १० मिनिटांत विद्यार्थ्यांनी आपली माहिती, बैठक क्रमांक त्यामध्ये भरणं अपेक्षित असतं. ११ वाजता पेपर सुरु होण्याच्या १० मिनिटं आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येतं आणि ११ वाजता प्रत्यक्ष परीक्षेस सुरुवात होते. यानंतर ११. ३० पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश दिला जात होता. मात्र गैरप्रकार निदर्शनास आल्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी ही अर्ध्या तासाची सुविधा बंद केल्याचं मंडळाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे.


परीक्षा संपल्यानंतरच बाहेर पडता येईल

विद्यार्थ्यांना परीक्षागृहात अर्धा तास आधी प्रवेश दिला जात असल्याने त्यांनी १०.३०  वाजता उपस्थित राहणं अपेक्षित असल्याचं मंडळानं परिपत्रकात नमूद केलं आहे. तसंच आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा गृहाबाहेरही जाता येणार नाही. जायचंच असल्यास त्याच्याकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका जमा करून घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका हवी असल्यास परीक्षा संपल्यानंतर ती देण्यात येईल, असंही मंडळानं म्हटलं आहे.हेही वाचा -

टेन्शन नाॅट!, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्ध्या तासापर्यंत 'एन्ट्री'

१० वी, १२ वी च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा