Advertisement

टेन्शन नाॅट!, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्ध्या तासापर्यंत 'एन्ट्री'

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पेपर सुरू झाल्यानंतर १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासापर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल, असं शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

टेन्शन नाॅट!, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्ध्या तासापर्यंत 'एन्ट्री'
SHARES

व्हॉट्सअॅपवरून पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा सुरू झाल्याच्या एक मिनिटानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला होता. या निर्णयामुळे १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना चांगलीच धडकी भरली होती. पण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल, असं शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.


काय होता बोर्डाचा निर्णय?

१० वी, १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पेपर सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास एक मिनिट देखील उशीर झाल्यास आत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थी आणि पालक धास्तावले होते.

त्यावर खुलासा करताना तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ११ वाजेच्या पेपरसाठी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी पोहोचणं अपेक्षित असलं तरी परिस्थिती पाहून विद्यार्थ्याला पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत आत प्रवेश दिला जाईल. मात्र त्यानंतर एकही मिनिट उशीर झाला, म्हणजेच तो ११ वाजून ३१ मिनिटांनी जरी पोहोचला, तरी त्याला परीक्षेला बसता येणार नाही.


परीक्षागृहात अर्धा तास आधी का ?

विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी येणं अपेक्षित का आहे? यावर स्पष्टीकरण देताना तावडे यांनी सांगितलं की, या अर्ध्या तासात परीक्षागृहात विद्यार्थ्यांचं हॉलतिकीट तपासणं, त्याला प्रश्नपत्रिका देणं पर्यवेक्षकाला शक्य होणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही तणावमुक्त परीक्षा देता येईल.


निर्णयावरून तावडे लक्ष्य

एसएससी आणि एसएससी बोर्डाच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नवी नियमावली म्हणजे सरकारचा तुघलकी निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना लक्ष्य केलं होतं.



हेही वाचा-

१० वी, १२ वी च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

अखेर 'लॉ' परीक्षेच्या वेळापत्रकांत बदल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा