Advertisement

गांधी जंयतीनिमित्त शाळेला 'नो हॉलिडे'


गांधी जंयतीनिमित्त शाळेला 'नो हॉलिडे'
SHARES

'गांधी जयंती म्हणजे सुट्टीचा दिवस' अशी संकल्पना असलेल्या अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. कारण यंदा गांधी जयंतीनिमित्त शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


वर्षभर राबवणार कार्यक्रम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी म्हणजे, १५० व्या जयंतीवर्षाची सुरुवात २ ऑक्टोबरपासून होत आहे. गांधीजींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्षाचं कार्यक्रम वर्षभर राबवण्याच्या सूचना सर्व शाळा आणि विविध शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. या वर्षाची सुरुवात २ ऑक्टोबरपासून होणार असून सर्व शाळांमध्ये सुरुवातीला प्रभात फेरी आणि गांधीवंदनेनं करण्यात येईल.

Screenshot_2018-10-01-08-47-34-884_com.google.android.apps.docs.png

स्पर्धांचंही आयोजन

वर्षभरात म्हणजे २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत सर्व शाळांना गांधीजींच्या जीवनकार्याविषयी वर्षभर उपक्रम घेण्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत वर्षभरात गांधीवादी विचारवंतांची व्याख्यानं आयोजित करण्यात येणार असून गांधी विचारांवर आधारित चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यास शाळा प्रशासनाला सांगण्यात आलं आहे.


सर्व शाळा सुरू

यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमार्फत त्यांच्या विभागात प्रभात फेऱ्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे दरवर्षी केवळ काही शिक्षक आणि मोजके विद्यार्थी शाळेत जमून साजरी होणारी गांधी जयंती यंदा मात्र सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच, या कार्यक्रमाचा अहवाल सरकारकडे सादर करायचा असल्यानं सर्वच अनुदानित आणि सरकारी शाळा यंदा गांधी जयंतीनिमित्त सुरू राहणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा